लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी.

.

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट आवाळपुर युनिट द्वारे मोठ्या प्रमाणात चुनखळीचे उत्खन केले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ-मोठी खड्डे निर्माण होऊन खड्ड्यांमध्ये अमलनाला धरणाचे लाभ क्षेत्रातील झिरपा ई. द्वारे लाखो लिटर पाणी जमा होते. अमलनाला लाभ क्षेत्रातील परिसरात जमा होणारे लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा अल्ट्राटेक सिमेंट आवाळपुर करित असून लाभ क्षेत्रातील पाण्याचा उपसा करीत असताना पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे असतांना कोणत्याही प्रकारची पाटबंधारे विभागाकडून परवानगी न घेता अवैध्यरित्या ४० लक्ष लिटर पाणी दैनदिन उपसा करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गेले असता. कपनी कडून त्यांची दिशाभूल करून मौका स्थळ‌ पाहणी करण्यास मनाई केली जाते. एकीकडे शेतकाऱ्यांच्या शेतीकरीता पाणी वापरास निर्बंध घातला जातो. मात्र परीसारतील मोठ-मोठ्या कंपण्यावर विभागाचे कोणतेही निर्बंध नसल्याने परीसारतील नागरिकांवर अन्याय होत आहे.
शाखा अधिकारी, गडचांदुर व विभागीय कार्यालयाचे राजस्व शाखेतील वरिष्ठ दप्तर करकुन यांनी दिनांक 10/01/2024 रोजी वर्धा नदी व अमलनाला वरील मिटर कॅलीब्रेषन करण्याकरीता गेले असतांना त्यांना माईन्स मधुन पाणी उचल करत असल्याची शंका आली. त्यामुळे त्यांनी कंपनीमधील युनिट हेडला माईन्स बघण्याची मागणी केली असता माईन्स मध्ये पाणी उचल होत नसल्याचे तसेच माईन्स दाखविण्यास मनाई करण्यात आले. त्यामुळे संबधित अधिकारी यांनी ड्रोनव्दारे माईन्सची सुटींग केली असता त्यांत सदर कंपनीकडुन पाणी उचल करीत असल्याचे दृष्य सामोर आले. चंद्रपूर जिल्हयातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपुर माईन्स मधुन अवैद्यरित्या बिगर सिंचन पाणी वापर करीत असल्याची चौकशी करून कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here