गडचिरोलीत पहिल्यांदाच खाजगी रुग्णालयात* *हृदय घातावर यशस्वी उपचार.* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *⭕डॉ आशिष खुणे आणि डॉ राहुल धाडसे यांच्या प्रयत्नांना यश* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचिरोली👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आणि मागास जिल्हा असून आरोग्याच्या सोयीसाठी एकमेव जिल्हा रुग्णालय हाच पर्याय आहे. इतर खाजगी रुग्णालय आहेत ज्या वेगेवगळ्या सुविधा देतात. यातच एक “स्पंदन” हॉस्पिटल आहे ज्या मध्ये नुकतेच ह्रदयघात या आजारावर डॉ खुणे आणि डॉ धाडसे यांनी थ्रोम्बोलाईस करून रुग्णाचे प्राण वाचवले.

दिनांक २१/०५/२०२४ रोजी
गडचिरोली येथील रामनगर मधील श्री सुरेश येरोजवार नामक रुग्ण स्पंदन हॉस्पिटल ला छाती दुखणे, आणि घाबरटपणा , श्वास घ्यायला अडचण अशी तक्रार घेऊन रुग्णालयात आले . यावेळी स्पंदन हॉस्पिटल चे डॉ खूने आणि डॉ धाडसे यांनी ई. सी.जी. करून लगेच निदान केले आणि तात्काळ इंजेक्शन मागवून रुग्णाला थ्रोम्बोलाईस केले. त्यामुळे हृदयाची ब्लॉक झालेली नस पूर्णपणे खुलून मोकळी झाली आणि रुग्णाचा त्रास कमी झाला आणि हृदय घातातून ते बरे झाले. दिनांक ६/६/२४ रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आणि अँजीओग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि अँजीओग्राफी ची रिपोर्ट सुध्दा नॉर्मल आली. उपचारा नंतर नातेवाईकांनी तात्काळ दिलेल्या सेवेबद्दल आणि प्राण वाचविल्याबद्दल डॉ आशिष खुणे आणि डॉ राहुल धाडसे यांचे आभार मानले. तर पहिल्यांदाच खाजगी रुग्णालयात ही प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉ खुणे आणि डॉ धाडसे यांनी देखील समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here