सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलावर खड्डे देत आहे डेंगू ला आमंत्रण ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕एकनाथ चित्ते यांनी दिला आंदोलनाचा इशारा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा -👉प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तालुक्यातील निमगाव गुरू येथील एकनाथ चित्ते यांच्या घरा समोरून सार्वजनिक बांधकाम विभागा चा रस्ता जात असल्याने रस्त्यावर असलेल्या पुला वर खड्डा पडला असून सदर खड्डयात पाणी साचल्याने आरोग्याला धोकादायक ठरत आहे,घरात असलेल्या लहान मुलांना डेंगू होण्याची दाट शक्यता आहे
निमगाव गुरू येथील ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ चित्ते यांच्या घरासमोर पूल असल्याने त्या वर खड्डा पडला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे सदर खड्डा अपघातास आमंत्रण देत असल्याने काही अनर्थ घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांना निवेदनात म्हटले आहे, निवेदन च्या प्रतिलिपी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे ,माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी बुलढाणा , ठाणेदार देऊळगाव राजा
यांना देण्यात आल्या आहे.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here