आदिवासी तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी…. अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन .पुणे 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पुणे शहर चे पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे ऊरुळी कांचन येथे नुकतेच आले होते …
जिल्ह्यातील आदिवासी व भटके विमुक्त गरीब कुटुंबातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावा,जंगल संस्कृतीमधुन बाहेर पडून स्पर्धा परीक्षेत उतरावे असे मत पुणे शहर चे अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले ते आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या मातोश्री ची भेट घेण्याकरता उरुळी कांचन येथे आले होते रंजनकुमार शर्मा यांनी आदिवासी पारधी समाजातील आदर्श माता शेवराबाई ज्ञा भोसले यांच्यासोबत चर्चा केली, महाराष्ट्र मध्ये विविध जिल्हा मध्ये पोलीस अधीक्षक पदावर काम करताना वेगवेगळे अनुभव आले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना आदिवासी पारधी समाजासाठी साहित्यिक.नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रम घेतले होते या प्रशिक्षणाचा फायदा तेथील तरुणांना झाला तरुणांनी मिळेल तिथे नोकरी करणे आज काळाची गरज आहे या आदिवासी समाजातील बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये लावण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू , आदिवासी समाजामध्ये असुन देखील नामदेव भोसले यांचे काम सर्वच घटकांसाठी पेरणादायी आहे,
असे ते बोलले.. यावेळी आदर्श माता शेवराबाई ज्ञा भोसले व ज्येष्ठ लेखक भास्कर भोसले, आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, तसेच उरुळी कांचनचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टिळेकर, कृषी आदर्श पुरस्कार प्राप्त बाळासाहेब चौरे, पोपटराव ताम्हणे, रियाज मणियार, शिंदेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य तुषार भोसले, ,स्वप्रित भोसले,
,सौ शोभा भोसले, सौ गौरी भोसले,ग्रामपंचायत सदस्य आश्र्वीनी भोसले उपस्थित होत्या,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *