लोळदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत
जिवती : विदर्भ महाविद्यालय जिवती व नवसाथी प्रा. लि. हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाच्या परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात इयत्ता दहावी पासून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्यांना रोजगाराच्या संधींबरोबरच मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी ही सुवर्णसंधी गमावू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी विदर्भ महाविद्यालय जिवतीचे रोजगार अधिकारी डॉ. परवेज अली (मो. ९५६१२३११७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आपल्या दारी चालून आलेल्या या संधीचा परिसरातील युवकांनी निश्चितच लाभ घ्यावा,” असे प्राचार्य डॉ. एस.एच. शाक्य यांनी जनतेस आवाहन केले आहे.