लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी
वालुर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी चेअरमन सय्यद जलाल यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चा सेलु तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष गणेश काटकर यांनी जाहीर केली.
सय्यद जलाल यांच्या नियुक्तीबद्दल माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर, राज्यमंत्री व पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, तालुका अध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.