By : Shankar Tadas
कोरपना (पालगाव) :
गेल्या 40 वर्षापासून पालगाव ते अल्ट्राटेक माईन्स गेट पर्यंत रस्त्याच्या मागणी करिता पालगाव जिल्हा प्रशासन आणि अल्ट्राटेक व्यवस्थापन यांचेकडे अनेकदा निवेदन सादर करीत, याशिवाय रस्त्याची दुरावस्था नागरिकांना होणारा त्रास या सर्व सबबीखाली अवगत करत अनेक आंदोलन झाली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने सरपंच अरुण रागीट व समस्त पालगाव वासियांनी एकमताने विद्यमान आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात दोनदा आंदोलन केले . शेवटी व्यवस्थापन नरमले व अल्ट्राटेक सिमेंट प्रशासन विरुद्ध पालगांव वासीयांची बहुप्रतीक्षित न्याय्य मागणी आता पुर्णत्वास आली. मैलाचा दगड ठरेल अशा माईन्स ते पालगांव रस्त्याच्या पाऊणे दोन कोटी रुपयाच्या बांधकामाचे काल आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
रस्त्याची प्रचंड दुर्दशा, अनेक आंदोलने, अल्ट्राटेकचे दुर्लक्ष, आणि जिव मुठीत घेऊन या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणारे पालगांव वासीय, शाळकरी विद्यार्थी आणि कामगार बांधव यांच्या लोकलढ्याचा सुवर्णदिन म्हणून आजचा दिवस पालगांवच्या इतिहासाला ठळकपणे लक्षात राहील. हा रस्ता व्हावा यासाठी मी देखील आग्रही भूमिका घेतली होती. याचे मलाही मनोमन समाधान वाटते, असे प्रतिपादन भुमिपुजनीय मनोगतातून आमदार भोंगळे यांनी केले.
कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, पालगांवचे सरपंच अरूण रागीट, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड श्री. श्रीराम, नमित मिश्रा, गडचांदूरचे भाजपाध्यक्ष अरविंद डोहे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, पुरुषोत्तम आस्वले, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, ललीत देवपूरा, सोदीप घोश, दिपक सुराणा, प्रतीक वानखेडे, निखिल भोंगळे,अशोक झाडे, पवन यादव, बिभीषण कुंभारे, प्रमोद वाघाडे, गणेश लोंढे, नितीन शेंडे, सचिन आस्वले, सूरज ओहळ, पुरुषोत्तम धाबेकर, महादेव मडावी, लालचंद नगराळे, गौतम खोब्रागडे, पांडुरंग रागीट, सिद्धार्थ कुंभारे, नरेंद्र मडावी, माया मडावी आदिंसह पालगांव वासीयांची मोठी उपस्थिती होती.