लोकदर्शन वालूर 👉महादेव गिरी
वालुर 15ऑगस्ट प्रतिनिधी : स्व. नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात महानुभव पंथाचे संस्थापक संत श्री चक्रधर स्वामी महाराज यांची जयंती दिनांक २५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डि. भोकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी. व्हि. बुधवंत, जय. एस. गिरी, आर. बि. राठोड, डि. आर. नाईकनवरे, एस. ए. महाडिक, जि. एम. कावळे, व्हि. एन. बोंडे, श्रीमती एस. आर. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात चक्रधर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्त भाषणे सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी चक्रधर स्वामींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
समारोपात अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस. डि. भोकरे यांनी विद्यार्थ्यांना चक्रधर स्वामींचे आदर्श जीवन अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. एम. कावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हि. एन. बोंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमाकांत क्षीरसागर, कैलास राऊत, बळीराम शेंबडे, विष्णु पंडित, नारायण आष्टकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.