लोकदर्शन वालूर 👉महादेव गिरी
क्रीडा व युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू व सेलू तालुका क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील वयोगट १९ वर्षांतील सहा खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
निवड झालेले खेळाडू :
खपले संस्कार
प्रसाद गोकनवार
अमरनाथ मसुरे
रेहान माझीद
शेख साहिल
पवन तळेकर
या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य रमेश नखाते, उपप्राचार्य सुरेश नखाते, क्रीडा विभाग प्रमुख दीपक ठोंबरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.