लोकदर्शन👉मोहन भारती
राजुरा . – देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी बेंगळुरूमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या मत चोरीबाबत सबळ पुरावे सादर केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसारण व विश्लेषण राजुरा काँग्रेसच्या नवीन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मत चोरी’ची सत्यता जाणून घेतली. माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांना निवेदन देऊन, राजुरा विधानसभा निवडणुकीतील बोगस मतदार नोंदणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, एड. अरुण धोटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्यासह विविध ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.