लोकदर्शन पुणे :👉राहुल खरात
ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने ‘आदर्श माता पुरस्कार २०२५’ सोहळा आणि एकल पालकांच्या १०० गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जीवनातील कठीण परिस्थिती, संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जात मुलांना सुजाण नागरिक म्हणून घडविणाऱ्या मातांचा ‘रणरागिणी’ म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत मानखेडकर (माजी डेप्युटी डायरेक्टर, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार) यांनी भूषविले.
सन्मानित आदर्श माता :
राजसबाई प्रभू मानखेडकर, डॉ. गौतमी पवार (माजी प्राचार्य, गरवारे कॉलेज), एचसी. डॉ. सविता मदनलाल शेटीया (संस्थापक अध्यक्षा, रिता इंडिया फाउंडेशन), सोनाली घोडके, धोंडाबाई गोतसुर्वे आणि शारदा गायकवाड.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :
एकल पालकांच्या मुलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. वंदना मधुकर सरवदे आणि संस्थापक सचिव प्रा. मधुकर म्हंकाल सरवदे यांच्याकडून सर्व पुरस्कार्थी मातांचे पूजन.
पुरस्कारार्थींना अंजनेय साठे (युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते) यांच्याकडून वॉटर जार व डब्बा भेट.
पल्लवी हेमाडे यांच्याकडून ‘कणी महिला मंच’ची एक वर्षाची सभासदत्व भेट.
विशेष उपस्थिती व मनोगत :
मानखेडकर सर म्हणाले, “वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना पालकांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
प्रमुख पाहुणे प्रविण शिंदे (संचालक, पुणे मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी सरवदे कुटुंबाच्या २० वर्षांच्या अविरत सामाजिक कार्याचे कौतुक केले.
डॉ. गौतमी पवार यांनी “विद्यार्थ्याने समाजासाठी एवढे कार्य करणे आणि गुरूंचा सन्मान होणे हा अभिमानाचा क्षण” असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेत योगदान :
श्री. सूर्यकांत पाटिल, पांडुरंग अंकुशराव, डॉ. निता बोडके, राहुल खरात यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिता शेटीया व शुभम ताजने यांनी केले. आयोजनात कार्तिकी सरवदे, संतोष माने, सुजाता माने, व्यंकटेश सुर्यवंशी, आकांक्षा धोत्रे, शैलेश उनवने, भाग्यश्री खेसे यांचे सहकार्य लाभले.