वालूर प्रतिनिधी :👉महादेव गिरी
श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वालूर येथे 9 ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिन’ आणि रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. या निमित्ताने इको क्लब आणि अटल टिंकरिंग लॅबच्या सहकार्याने बारावीच्या विद्यार्थिनींनी अटल लॅबमध्ये स्वतः तयार केलेल्या राख्या शालेय परिसरातील झाडांना बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात प्राचार्य रमेश नखाते यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमात उपप्राचार्य सुरेश नखाते, सतीश साबळे, सुमेध आवटे, वैभव सुरळकर, जिजाभाऊ नखाते, गजानन महाले, बालाजी मुळे, दत्ता लेवडे, हनुमंत होनराव, गोविंद केंद्रे, अशोक सुरवसे, भगवान पल्लेवाड, प्रदीप कांबळे, दीपक ठोंबरे, श्रीमती सविता शेळके, श्रीमती एस. के. इंदूरकर, माणिक नखाते, राजेश पानझडे, सुरेश शिंदे, बाळू गोरे आणि देविदास कुटे यांनी परिश्रम घेतले.