महात्मा गांधी सायन्स कॉलेजमध्ये ‘आर्थिक संपत्ती व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र

गडचांदूर |👉 मोहन भारती

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरच्या वतीने “आर्थिक संपत्ती व व्यवस्थापन” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुणे येथील प्रख्यात आर्थिक सल्लागार चंद्रकांत तुरारे यांनी उपस्थित शिक्षकांना गुंतवणुकीसंदर्भातील विविध पर्यायांवर सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, एफ.डी., शेअर बाजारातील गुंतवणूक, एसआयपी, सोन्यात गुंतवणूक, आणि मालमत्ता खरेदी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा विचार करताना त्यांनी योग्य आर्थिक नियोजनाच्या गरजेवर भर दिला. गुंतवणूक करताना धोका व परतावा यामधील समतोल साधण्याचे तत्त्व त्यांनी सोप्या भाषेत समजावले. आर्थिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी म्हणाले की, “आजचे नियोजनच उद्याची सुरक्षितता निश्चित करते.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहूरे यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पवन चटारे यांनी अत्यंत सुरेखरित्या पार पाडले.

या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातील आर्थिक स्थैर्य व गुंतवणुकीच्या दिशेने प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया सहभागी शिक्षकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here