लोकदर्शन👉मोहन भारती
राजुरा, दि. २६:
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे हितचिंतक व संवेदनशील आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली, यावर्षीही राज्याचे माजी मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक ३० जुलै रोजी राजुरा, घुग्घूस आणि पोंभुर्णा या ठिकाणी एकाच दिवशी भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
या शिबिरात सर्वच प्रकारच्या आजारांवर निदान, तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया मोफतपणे करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
🔹 ठिकाणे व वेळ:
▪ राजुरा: महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय
▪ घुग्घूस: प्रयास सभागृह
▪ पोंभुर्णा: ग्रामीण रुग्णालय परिसर
🕘 वेळ: सकाळी ०९ वाजेपासून
या शिबिरात चंद्रपूर जिल्ह्यातील व नागपूर येथील प्रमुख रुग्णालयांतील विविध विशेषतज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार असून नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, कॅन्सर, अस्तिरोग, ईएनटी इत्यादींच्या मोफत सेवा दिल्या जाणार आहेत. विशेषतः मोतीबिंदू शस्त्रक्रियाही पूर्णतः मोफत केली जाणार आहे.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.