स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दिशा

✍️ लोकदर्शन👉मोहन भारती

*गडचंदूर शिक्षण प्रसारक मंडळ* संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचंदूर येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रा’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात ‘अभ्यास कौशल्य व वेळ व्यवस्थापन’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी भूषवले.

विशेष मार्गदर्शक म्हणून नरसिंग पाचाळ सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना लागणारी योग्य अभ्यासपद्धती, वेळेचे नियोजन, मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

या सत्रावेळी प्रा. प्रदीप परसुटकर व प्रा. आशिष देरकर यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संगीता पुरी व प्रा. चेतना येरणे यांनी उत्साहात पार पाडले.

कार्यक्रमाला अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सत्रानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक होत्या. त्यांनी हा कार्यक्रम प्रेरणादायी, दिशा देणारा व अभ्यासात गती निर्माण करणारा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी समर्पित सहभाग दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here