बल्लारपूरच्या विकासाला गती; रोजगार हमी योजनेंतर्गत 5.43 कोटींचा निधी मंजूर

लोकदर्शन👉 मोहन भारती

चंद्रपूर, दि. 23 जुलै:
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लोकहिताच्या कामांना मोठा चालना मिळाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) पोंभुर्णा, मूल व बल्लारपूर तालुक्यातील अपूर्ण सार्वजनिक कुशल कामांसाठी 5 कोटी 43 लाख 20 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असून, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या अनेक कामांना वेग मिळणार आहे. या निधीच्या प्रभावी वाटपामुळे अनेक गावांमध्ये अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार असून, ग्रामस्तरावर समृद्धी निर्माण होईल.

निधी मंजुरी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार व आयुक्तालय स्तरावरील सूचनांच्या आधारे करण्यात आली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार हे आपल्या मतदारसंघाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी कटिबद्ध असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे.

यामुळे गावागावांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून, ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.

✍️ लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here