*लोकदर्शन ✍️ जिवती | वार्ताहर – प्रा. गजानन राऊत*
विदर्भ महाविद्यालय, जिवती येथील मराठी विभाग व महिला सक्षमीकरण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने “लैंगिक छळ, कायदे आणि सुव्यवस्था” या विषयावर जनजागृती कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून *मा. प्रवीण जाधव (ठाणेदार – जिवती)* यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
*ठाणेदार प्रवीण जाधव* यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “लैंगिक छळ ही केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेला हादरा देणारी समस्या आहे. युवक-युवतींनी कायद्याचे भान ठेवून सजग नागरिक बनले पाहिजे. पोलीस यंत्रणा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
तसेच त्यांनी *POCSO* कायदा, *POSH* कायदा, आणि सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती देत, “सजग राहा, सुरक्षित राहा” हा संदेश दिला. आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास, आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे मिळवलेले यश विद्यार्थ्यांसोबत शेअर करत त्यांनी त्यांच्यात प्रेरणा जागवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष *डॉ. शाक्य* यांनीही लैंगिक छळाविरोधातील सजगता, कायदेशीर जाणीव आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित केली. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि कायदेशीर जाणीव वाढीस लागते, असे त्यांनी नमूद केले.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देशमुख, प्रा. मंगाम, प्रा. लांडगे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन राऊत यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. वैशाली डोर्लीकर (प्रमुख – महिला सक्षमीकरण कक्ष) यांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य कार्यक्रम यशस्वीतेस कारणीभूत ठरले.
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर
(वार्ताहर – प्रा. गजानन राऊत)