वालुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी

वालुर येथील माळी गल्लीमध्ये श्री संत सावता महाराज यांच्या 730 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून, दिनांक 16 जुलै ते 23 जुलै 2025 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात सरपंच संजय साडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

या सप्ताहातील कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

सकाळी 4 ते 6: काकडा भजन

सकाळी 6 ते 9: ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

दुपारी 11 ते 1: गाथा भजन

सायंकाळी 6 ते 7: हरीपाठ

रात्री 9 ते 11: विविध ह.भ.प. महाराजांचे हरिकिर्तन आणि नंतर जागर

प्रमुख किर्तनकारांचे तपशील:

16 जुलै (बुधवार): ह.भ.प. कृष्ण महाराज रासवे

17 जुलै (गुरुवार): ह.भ.प. माऊली महाराज चव्हाण (सेलुकर)

18 जुलै (शुक्रवार): महादेव महाराज राऊत (बीड)

19 जुलै (शनिवार): सद्गुरू नामदेव महाराज चारठाणकर

20 जुलै (रविवार): ह.भ.प. पंकज महाराज थोरे (देवनांद्रा)

21 जुलै (सोमवार): ह.भ.प. शंतनु महाराज पाठक

22 जुलै (मंगळवार):

सायंकाळी 6 ते 7: श्री 1008 महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांचे प्रवचन

रात्री 9 ते 11: ह.भ.प. राघव चैतन्य स्वामी महाराज यांचे किर्तन

23 जुलै (बुधवार):
सकाळी संत सावता महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले असून,
सकाळी 11 ते 1: परमहंस परिव्राजकाचार्य श्री 1008 स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहभर चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here