लोकदर्शन👉मोहन भारती
जिवती (ता.प्र.):
जिवती तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार आणि नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा सोहळा पार पडला. महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा जपत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलनामाचा गजर करत दिंडी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले. या दोन उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिभाव व राजकीय जागृतीने न्हाल्याचे दृश्य दिसून आले.
दिंडी सोहळ्याची सुरुवात विठ्ठल-रखुमाई मंदिर, बस स्टॉप जिवती येथून करण्यात आली आणि समारोप विदर्भ कॉलेज येथे झाला. या सोहळ्यात नागरिकांनी, महिला मंडळांनी, युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
याचवेळी काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्ताराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नव्याने नियुक्त झालेल्या तालुका अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी सर्व नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि काँग्रेस पक्षाचे मूल्य, धोरणे व कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका ठामपणे मांडली. “पक्षाचा कार्यकर्ता हा लढवय्या असतो, जो कुठल्याही परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांशी लढतो,” असे ते म्हणाले.
तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:
माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे
प्रमुख अतिथी:
अरुण धोटे (माजी नगराध्यक्ष)
भीमराव पा. मडावी (आदिवासी नेते)
गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, भोजू पा. आत्राम, कलीमभाई शेख, अजगर अली, पंढरी गायकवाड
मारोती मोरे, दत्ता तोगरे, माधव डोईफोडे, रामदास रणवीर, सुमनबाई शेळके, शब्बीर शेख, ताजुदीन शेख, तिरुपती पोले
गणेश वाघमारे, दत्ता गायकवाड, बंडू राठोड, केशव भालेराव, अमोल कांबळे, सिताराम मडावी, माधव शेंबडे मामा, मुन्नीरभाई, विजय कांबळे
बाळू पतंगे, देविदास साबणे, बाबाराव कांबळे, बाजीराव पा. वल्का, उत्तम कराळे, नामदेव जुमनाके व काँग्रेसचे फ्रंटल आर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवाने राजकीय ऊर्जा व धार्मिक श्रद्धा यांचे उत्तम समन्वय साधत जिवती तालुक्यात काँग्रेसच्या नव्या पर्वाची नांदी घातली आहे.