🌴🌳🌲🌵🥀💐🎄
(लोकदर्शन न्यूज 👉मोहन भारती) :
‘स्वच्छ, सुंदर आणि हरित गडचांदूर’ या संकल्पनेतून *श्रीतेज प्रतिष्ठानतर्फे* ‘ग्रीन गडचांदूर’ या विशेष पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ आषाढी एकादशीच्या (दि. 6जुलै 2025) दिवशी होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता अचानक चौक, दुर्गा माता मंदिर, आनंदनगर येथून होणार असून, हा संपूर्ण उपक्रम हरित गडचांदूर घडविण्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गडचांदूर शहर भक्तीमय वातावरणात न्हालं आहे. मुख्य रस्त्यावर लाऊड स्पीकरद्वारे विठ्ठलाचे अभंग, गवळणं आणि भक्तिगीते सतत ऐकू येत असून, सर्वत्र “विठोबा रुख्मिणी” च्या जयघोषाने गडचांदूर भक्ती आणि उत्साहात न्हालं आहे.
या उपक्रमात खालील विविध उपक्रम राबवले जाणार आहेत:
वृक्षारोपण
भिंतीचित्र व रंगकाम
प्लास्टिकमुक्त मोहिम
जलस्रोत संवर्धन
रस्ता स्वच्छता
महिला व विद्यार्थी स्पर्धा
सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा
या मोहिमेच्या आयोजनासाठी श्रीतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. तेजस गोंडाने यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, युवक, शिक्षक, महिला मंडळ आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासोबत बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली.
“शहराला हरित बनवण्यासाठी संकल्पाबरोबर कृती गरजेची आहे. प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदवावा,” असे आवाहन श्री. गोंडाने यांनी केले.
स्वयंसेवक नोंदणी सुरू असून, त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. संपूर्ण जुलै महिन्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यानंतरही सातत्याने उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस आहे.
लोकदर्शन न्यूज पोर्टल वाचकांना आवाहन —
आपणही या ग्रीन उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गडचांदूरला अधिक स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय बनवण्यासाठी पुढाकार घ्या.
संपादक – लोकदर्शन न्यूज पोर्टल
गडचांदूर
📞 संपर्क –