लोकदर्शन न्यूज पोर्टल प्रतिनिधी:👉 गुरुनाथ तिरपणकर
बदलापूर, ता. ३ जुलै — समाजकार्य करणे हे जितके आव्हानात्मक असते, त्याहून अधिक कठीण आणि धैर्याची गोष्ट म्हणजे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू करून ते यशस्वीपणे चालवणे. यवतमाळ येथून प्रकाशित होणाऱ्या दै. प्रजा शासन या दैनिकाने आपल्या प्रभावी, मुद्देसूद आणि जनहितवादी लेखणीद्वारे लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
या वृत्तपत्राच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय मुख्यत्वे संपादक संजय कांबळे यांना जाते. त्यांच्या बौद्धिक नेतृत्वाला सहसंपादक विक्रांत शिरसाट व उपसंपादक प्रदीप पोटफोडे यांचे अमूल्य सहकार्य लाभत आहे. या तिघांचेदेखील सामाजिक भान आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
या तिघांनाही त्यांच्या संपादकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जनजागृती सेवा संस्था यांच्यावतीने “समाजरत्न” पुरस्काराने ऑनलाईन स्वरूपात सन्मानित करण्यात आले आहे.
या गौरवाबद्दल जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संपर्क प्रतिनिधी: गुरुनाथ तिरपणकर, लोकदर्शन न्यूज पोर्टल