उद्योगसमुहांनी पर्यावरण रक्षणाची धुरा स्वीकारावी – आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

लोकदर्शन मुंबई :👉मोहन भारती

राज्यातील उद्योगसमुहांनी केवळ CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत सामाजिक उपक्रमच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘ब्रँड ऑफ द इयर २०२५’ शिखर परिषदेत केले.

या परिषदेत देशातील प्रतिष्ठित ब्रँड्सना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले की, “पूर्वी CSR ऐच्छिक होती, आता सर्वच उद्योगसमूह योगदान देतात. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीनेही किमान ०.२५% CSR निधी खर्च व्हावा, अशी अपेक्षा आहे. मी यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे.” त्यांनी जापान व जर्मनीच्या गुणवत्तेची उदाहरणे देत भारतीय ब्रँड्सना जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मुनगंटीवार म्हणाले, “महाराष्ट्र हे ‘इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन’ बनत आहे. सरकारकडून उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य मिळेल. चांगले पर्यावरण आणि वायू बदलावर उपाय म्हणून CSRमधून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्यावे.”

या परिषदेत आर. गोपालकृष्णन, प्रिधी गुप्ता, ललातेंदू पांडा, वनिता केशवानी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
मुनगंटीवार यांच्या या आवाहनामुळे उद्योगसमुहांनी पर्यावरण रक्षणाच्या दिशेने अधिक ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here