लोकदर्शन जिवती👉प्रा.खेडकर
जिवती (प्रतिनिधी) – येथील विदर्भ महाविद्यालयात सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि बहुजन समाजासाठी जीवन अर्पण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर झालेल्या भाषणात प्रा. गंगाधर लांडगे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य केले. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा.”
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांनी देखील मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शाहू महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या सामाजिक संरचनेत अत्यंत लागू आहेत. त्यांचे तत्त्वज्ञान सामाजिक समतेसाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमित बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले