लोकदर्शन न्यूज पोर्टल
(प्रतिनिधी:👉 शिवाजी सेलोकर)
घुग्घुस, दि. ९ जून:
मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, घुग्घुस येथे आदिवासी जननायक, क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले, “वीर बिरसा मुंडा हे केवळ आदिवासींचे नव्हे तर संपूर्ण देशाचे क्रांतिसूर्य होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध ‘उलगुलान’चे आंदोलन उभारून आदिवासी समाजाला हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सत्तेला हादरा बसला. त्यांचे जीवन आजही प्रत्येक युवकासाठी मार्गदर्शक आहे.”
कार्यक्रमात डॉ. सुर्यभान वासेकर, निखिल आत्राम, मंगेश उलमाले, गौरव तुराणकर, निशा उरकुडे, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, भारती परते, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभिडकर, जाई आत्राम, नेहा कुम्मरवार आदी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात अत्यंत सन्मानपूर्वक पार पडले.
— लोकदर्शन न्यूज पोर्टल
(प्रतिनिधी: शिवाजी सेलोकर)