लोकदर्शन प्रतिनिधी👉 : अशोककुमार भगत, गडचांदूर
गडचांदूर – येथील भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सोमाजी गोंडाने होते. उद्घाटन प्रा. डॉ. प्रविण येरमे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बौध्दाचार्य श्रावण जीवने, दिव्यकुमार बोरकर, राहुल निरंजने, प्रा. माधुरी उके, प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे, प्राचार्य साईनाथ मेश्राम, मरापे सर तसेच पोलिस उपनिरीक्षक पिंपळकर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. येरमे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून समाजात नावलौकिक मिळवण्याचे आवाहन केले. पोलिस उपनिरीक्षक पिंपळकर मॅडम यांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्यावर भर दिला. अध्यक्ष डॉ. गोंडाने व इतर मान्यवरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नात्याचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमात सानिका गेडाम, प्राची बोंडे, समृद्धी पाटील, मनस्वी निरंजने, सिद्धी खाडे, अंकुश बावणे, प्रिया येलमुले, प्रथम ताकसांडे, ओम मरापे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर चुनारकर यांनी केले. प्रास्ताविक बौद्धाचार्य श्रावण जिवणे यांनी तर आभार प्रदर्शन बौध्दाचार्य बादल चांदेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कविकर निरंजने, बेबीताई वाघमारे, डॉ. शामराव धोपटे, एकनाथ पाटील, भिमराव पाटील, दिपक खाडे, आशिल निरंजने, दिवाकर भगत, सक्षम खैरे, प्रिया झाडे, तनु ताकसांडे यांनी मेहनत घेतली.
हा सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरला.