लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममतबादे
उरण, दि. २५ (विठ्ठल ममताबादे):
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकमधील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर देशभर भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्यात येत आहे.
उरणमध्ये दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी १२ वाजता आरपीआय तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा भव्य स्वरूपात पार पडली. यात्रा आरपीआय कार्यालय, उरण येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान, बौद्धवाडा येथे पुतळ्याला अभिवादन करून समाप्त झाली.
या यात्रेत आरपीआय, शिवसेना व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये संजय गायकवाड, सुलेमान शेख, खालीक शेख, सुयोग गायकवाड, सुनील कोल्हे, सूर्यकांत शिंदे, देवेंद्र कोळी, शैलेश मूलके, कुणाल जाधव, विशाल कवडे, प्रज्वल वाघमारे, लाल नूर शेख, नरेश बॅगर, प्रकाश पिल्ले, संजय गायकवाड, दत्ता गायकवाड, अतुल पुंदीर, प्रशांत भागा, रमेश कातकरी, प्रकाश धसाडे, गौतम कांबळे, जयभीम झळकी, धुळप्पा, आज्ञाराम यादव इत्यादींचा समावेश होता.
यात्रेदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी उरण शहर दुमदुमून गेले होते. यात्रेने राष्ट्रप्रेम, सामाजिक एकोपा आणि शूर सैनिकांप्रती आदर व्यक्त केला.
—