लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
गडचांदूर : गडचांदुर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व जेष्ठ प्राध्यापक, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन रिअल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील दिला जाणारा नॅशनल टीचर एक्सलन्स अवॉर्ड 2025 धुळे येथील राष्ट्रीय परिषदेमध्ये सपत्नीक प्रदान करण्यात आलेला आहे.
धुळे येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक आप्पासाहेब पवार अवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, डॉ. मनोहर पाटील, रियल इंडो ग्लोबल विजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संभाजी पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते डॉ.हेमचंद दुधगवळी यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.हेमचंद दुधगवळी हे शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील मराठीचे जेष्ठ प्राध्यापक असून ते गोंडवाना विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचा विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निकटचा संबंध आहे. त्यांची अध्यापन सेवा 30 वर्षे झाली असून पीएचडी पदवीचे मार्गदर्शक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी पीएचडी करीत आहे. तसेच त्यांचे विविध जर्नल्स मध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. त्यांच्या या यशाचे कोरपना तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष अशोककुमार भगत, के.के. श्रीवास्तव, सिद्धार्थ गोसावी, रवींद्र नगराळे, रत्नाकर चटप, संदीप खिरटकर, मोहन भारती, जयंत जेणेकर, प्रमोद खिरटकर, दीपक वरभे, प्रमोद वाघाडे, आदींनी अभिनंदन केले आहे.