By : Shankar Tadas
गडचांदूर : मित्रांगन बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच या संस्थेतर्फे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी श्री विवेक बोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच या संस्थेच्या माध्यमातून गरजू महिला ना शिलाई मशीनचे वितरण, कोरोना योद्धांचा साडी चोळी, शाल श्रीफळ देऊन आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात आमदार देवराव दादा यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करून करण्यात आले,आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना श्री देवराव दादा भोंगळे यांनी श्री विवेक बोडे हे आपल्या सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत असताना रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी तत्परतेने धावून जाणार काम विवेक भाऊ मागील कित्येक वर्षापासून करीत आहे गरीबातील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे कार्य विविधतेने केलेला आहे, त्यांच्या वाढदिवशी हितेश चव्हाण यांच्या नेतृत्वात मित्रांगन ने आयोजित केलेले सेवाभावी कार्य खरच विविवेक भाऊच्या सेवेला नक्कीच बळ देईल अशी भावना या ठिकाणी आमदार देवराव दादा भोंगळे यांनी व्यक्त केले . सदर कार्यक्रमाला अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून आमदार भोंगळे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर गायकवाड, डॉक्टर सोहेल शेख , अरुणभाऊ डोहे भाजपा शहर अध्यक्ष गडचांदूर , व्यापारी असोशियन अध्यक्ष हंसराजजी चौधरी, विजयालक्ष्मी ताई डोहे जिल्हा महामंत्री, महादेवजी एकरे, जिल्हा पशुपालक संघटना अध्यक्ष पवन दीप यादव, शितलताई धोटे शहर अध्यक्ष, सपनाताई शेलोकर, सुरेश भाऊ रागीट शहर अध्यक्ष भाजपा राजुरा, वामनभाऊ तुरंनकर , सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थांन चे कोषाध्यक्ष कणीरामजी पवार , रोहनजी काकडे आसिफभाऊ सय्यद , प्राध्यापक मेनिचंद राठोड सर, राकेशजी अरोरा, सत्यदेवजी शर्मा, महेश घरोटे, अजीम शेख, संगीताताई पातुरकर, डी एन पवार सर, शंकर राठोड सर, उल्हास पवार सर, वामन महाराज जाधव, शिवाजी राठोड सर, उमाताई कंठाळे, वूनदा चावले, इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय दिलीप राठोड सर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्तावित मित्रांगण संस्था चे अध्यक्ष हितेश चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे आभार सन्माननीय मेहताप सर , आणि महेश भाऊ घरोटे यांनी मानले, सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप गुडेलीवार,, हेमंत पातुरकर , प्रवीण देवाळकर, यांनी अथक परिश्रम घेतले,