जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथे शास्त्रज्ञ परिचय, गडकिल्ले प्रदर्शन आणि हस्तलिखित प्रकाशन

By : Shankar Tadas
कोरपना : पंचायत समिती कोरपणा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत मौजा सोनुर्ली (वन)येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथे दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी शास्त्रज्ञ परिचय व गड किल्ले प्रदर्शनी तथा हस्तलिखित प्रकाशन आणि इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या विविध अंगी कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश मोहितकर यांचे अध्यक्षतेखाली ,सोनुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख विलास देवाळकर, वासुदेव सिडाम सरपंच ग्रामपंचायत सोनुर्ली ,मोहन बोढाले तंटामुक्ती अध्यक्ष ,विकास बोरकर पोलीस पाटील, प्रभाकरजी लोंढे सचिव हनुमान देवस्थान कमिटी, अरविंद दुर्गे मिलिंद बौद्ध विहार कमिटी ,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुजाता पडवेकर ,सदस्य कैलास कांबळे, उज्वला नगराळे यांचे प्रमुख उपस्थितीत , सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज,विज्ञाननिष्ठा राष्ट्रसंत गाडगेबाबा, घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने व पुष्पगुच्छने स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेचे विषय शिक्षक श्री विजय राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की विद्यार्थ्यांच्या डोक्यात माहिती कोंबून भरणे म्हणजे शिक्षण नव्हे ,तर शिक्षकांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची लालसा निर्माण झाली पाहिजे, त्याला ज्ञानाची भूक लागली पाहिजे याच उक्तीला अनुसरून विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ल्यांची ओळख हा प्रकल्प राबवून , विद्यार्थ्यांच्या मनात भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारस्या बद्दल आवड निर्माण व्हावी ,त्यातून भावी इतिहास संशोधकांचे बिजारोपण व्हावे यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या सोबतच दुसरा प्रकल्प म्हणजे थोर शास्त्रज्ञाची ओळख व परिचय.अनादी काळापासून विविध शास्त्रज्ञाने नाना प्रकारचे शोध लावून मानवी जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न – जात, धर्म, पंथ ,वंश आणि देश या पलीकडे जाऊन केलेला आहे. असे संशोधन करण्यासाठी या शास्त्रज्ञांना करावी लागलेली मेहनत ,प्रयत्न ,चिकाटी व जिद्द या गुणांचा परिचय व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये, विज्ञान शिक्षण व संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यामागील हेतू असल्याचे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले.

सोबतच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्यातील चित्रकार , कवी ,लेखक शब्दबद्ध करण्यासाठी आठवणीचा ठेवा या विद्यार्थ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की ,गड किल्ले प्रदर्शन व शास्त्रज्ञ परिचय अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच जिल्हा परिषद शाळा सोनुर्ली येथे राबवून शाळेने परिसरातील इतर शाळांसाठी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. असे गौरवोद्गार काढले आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन स्वहस्ते लिखित व संपादित केलेले हस्तलिखित म्हणजे शाळेत येणाऱ्या पुढील विद्यार्थ्यांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून काम करेल असे आपल्या मनोगतातून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक बाळा बोढे यांनी हस्तलिखिताचे माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आठवणी निरंतर जपल्या जातील असे मत व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश मोहितकर, सरपंच वासुदेव सिडाम ,पोलीस पाटील श्री विकास बोरकर ,तंटामुक्ती अध्यक्ष मोहन बोढाले, हनुमान मंदिर देवस्थान कमिटीचे सचिव प्रभाकर लोडे, मिलिंद बौद्ध विहार कमिटीचे अरविंद दुर्गे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुजाता पडवेकर, सदस्य कैलास कांबळे ,उज्वला नगराळे यांनी शाळा राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आपण सदैव शाळेच्या विकासासाठी सोबत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषद शाळेतील चिमुकली विद्यार्थी अस्खलितपणे गड किल्ल्यांचा परिचय व शास्त्रज्ञांचा परिचय उपस्थित मान्यवरांना अगदी छोट्या वयात करून देत असल्याने उपस्थितांची मने भारावून गेलीत.

शाळेच्या सर्व उपक्रमात हिररीने सहभाग घेणारी, शालेय बचत बँकेची व्यवस्थापक, मनमिळावू, आज्ञाधारक, विद्यार्थिनी कु .राणी टोंगे या विद्यार्थिनीचा वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने यावेळी केक कापून व नृत्य सादर करून साजरा करण्यात आला.

शेवटी विद्यार्थ्यांना नोटबुक पेन आणि मिष्ठांन्न भोजनाचे वितरण करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कनिष्का कैलास कांबळे इयत्ता सहावी, प्रास्ताविक श्री विजय राऊत यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी आरोही जयसेन नगराळे इयत्ता सहावी हीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सोनुर्लीचे सरपंच वासुदेव सिडाम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश मोहितकर , मुख्याध्यापक बाळा बोढे , शिक्षक विजय राऊत , सुनील अलोने , कु.हिरादेवे,कु.मुंडे , शिक्षणप्रेमी कु. पल्लवी कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here