२६ नोव्हेंबर रोजी जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन. ⭕शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे आयोजन. ⭕२ ऑक्टोबर रोजी होणारे आंदोलन lरद्द, वेळेत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास २६ नोव्हेंबर रोजी करणार चॅनेल बंद आंदोलन. ⭕वेळेत सर्व कामे करण्याचे सरकारला दिला अल्टीमेटम

 

लोकदर्शन.उरण.👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २ ऑक्टोंबर NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा २५६ कुटुंबांनी ३९ वर्ष उलटून ही शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले पहिले पुनर्वसनाचे काम चालू करणे साठी दि.०२/१०/२०२४ रोजी जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन जाहीर केले होते. ते पुढे ढकलून संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२४ रोजी जेएनपीए (जेएनपीटी )चे समुद्रातील मार्ग अडवून चॅनेल बंद आंदोलन करणार असल्याची माहिती शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

पुनर्वसन संदर्भात मा.उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोलीस स्टेशन, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा पोलीस स्टेशन यांनी विस्थापिता सोबत NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील श्री हनुमान मंदिरात दि.०१/१०/२०२४ रोजी बैठक घेतली आहे. त्या बैठकीत ठरल्या प्रमाणे JNPT ने जेएनपीटी कामगार वसाहतीला लागून जसखार व फुंडे गाव नकाशातील NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबांचे शासनाचे मापदंडाणे दि.१२/११/१९८२ ते १२/०३/१९८७ मध्ये पायरी पायरीने मंजूर असलेले पहिले पुनर्वसन करण्यासाठी दिलेल्या विकसित जमिनीत दि.०३/१०/२०२४ रोजी पासून नागरी सुविधेची कामे सुरू करणे मान्य केले, शेवा कोळीवाडा गावठानाचे नकाशास शेवा भाग ३ देवून २५६ भूखंडाणा व नागरी सुविधेच्या भूखंडाणा स्वतंत्र गाव नमूना ७/१२ ना शेवा सर्व्हे नंबर देवून प्रत्येक भूखंड धारकांना शेवा सर्व्हे नंबरचे ७/१२ वाटप करणे मान्य केले. संक्रमण शिबिरातील घरांचे मूल्यांकन करून घेवून JNPA ला मंजूरी साठी देणे मान्य केले, NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी पुनर्वसन पूर्ण होई पर्यंत JNPA ने घेतल्याचे दि. ३०/०९/२०२४ रोजी विस्थापितांना पत्र दिले आहे. पुनर्वसनाची सर्व कामे मान्य केली ती दि.१५/११/२०२४ रोजीच्या आत पूर्ण करण्याची लेखी हमी मा.उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड व JNPA व्यवस्थापन यांच्या दोघांच्या सहीने दि. ०१/१०/२०२४ रोजी दिली आहे. त्या दिलेल्या कालावधी पुरता विश्वास ठेवून विस्थापित यांनी दि.०२/१०/२०२४ रोजीचे जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन जाहीर केले होते. ते पुढे ढकलून संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन २६ नोव्हेंबर २०२४ रोजी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here