लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे. ♦️कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– तहसील कार्यालय कोरपना येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महसुल दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वर्ग एक च्या सातबाऱ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच सर्व सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण होतो मात्र अनेकदा विविध तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना तातडीने मिळेल यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. तसेच आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने, तहसीलदार व्हटकर, तहसीलदार चिडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, संभाजी कोवे, भाऊराव चव्हाण, सुरेश मालेकार, वहाब भाई, रोशन आस्वले, रसूल भाई, अनिल गोडे, इस्माईल शेख, निसार भाई, उमेश राजुरकर, एकनाथ गोखरे, राहुल मालेकार, संजय जाधव, विलास आडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here