अभंग विठ्ठल

अभंग

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

देव माझा आहे /विठ्ठल सावळा/
गळा घाली माळा /तुळशीच्या//

पायी वारी दिंडी /निघाली पंढरी/
भक्त वारकरी /भजनात//

हरी मुखे नाम /चिपळी मृदुंग/
चाले भक्ता संग/पायी पायी//

बोलावे विठ्ठल/ भजनात दंग/
आनंदाचे रंग/ रिंगणात//

वाजवी टाळी/मुखे नाम हरी/
चाललेत पंढरी /दर्शनाला//

सौ भारती वाघमारे
मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here