लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
. गडचांदूर, ता. कोरपना (दि. २) — श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त गडचांदूर शहरासह परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आमदार देवराव दादा भोंगळे यांनी विविध ठिकाणी भेट देत संकटमोचक श्री बजरंगबलीचे दर्शन घेतले व पूजा-अर्चना केली.
यावेळी त्यांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनतेच्या सर्वमंगलतेसाठी श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना केली. श्री हनुमानजी हे शक्ती, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक असून त्यांच्या जीवनातून संकटातही धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच गडचांदूर व परिसरातील जनतेवर श्री हनुमानजींची कृपादृष्टी सदैव राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने जनतेच्या सेवेचे बळ मिळत राहो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी सर्व नागरिकांना श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपाचे तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, महेश शर्मा, नगरसेवक सतीश बेतावार, महेश घरोटे, विश्वंभर झाम, विवेकानंद ऊरकुडे, गोलू इखारे, स्वप्नील छाजेड, सचिन चुऱ्हे, गणेश आदे, रऊफ शेख, चमन शेख, मोहन भारती, वासुदेव वैरागडे, सुरेश मेश्राम, योगेश बांदुरकर यांच्यासह श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





