लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
कोरपना : नगर पंचायत कोरपना आणि युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सम्मान समारोह मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या कार्यक्रमात समाजात संघर्ष करून यश मिळवलेल्या अनेक कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि आकर्षक बक्षिसांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व विधायक व जिल्हा बँक संचालक सुदर्शन निमकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिला शक्ती ही घर, समाज आणि राष्ट्राची मजबूत पायाभरणी आहे. आज महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.”
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांनी सादर केलेले लोकप्रिय नाटक “न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” होय. या नाटकासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित महिलांना भरपूर मनोरंजनाचा आनंद दिला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
समाजात मेहनत करून आपली ओळख निर्माण केलेल्या अनेक महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये हिराताई श्याम रणदिवे, ज्योति अनिल रेगुंडवार, बेबी गज्जलवार, सुशीला पारखी, कौशल्या गिरटकर, करिश्मा पाचभाई, अल्का हुलके, विजया रामटेके, फरजाना शेख, अशरफ फुनिसा शेख, शीतल माथनकर, गीता पंदिलवार, लक्ष्मी भटगरे, सुनंदा बेरड, मधुमती ढोके, मनिषा तुराणकर, जिजा ठाकरे, बेबी तोडासे यांच्यासह अनेक महिलांचा गौरव करण्यात आला.
पैठणी स्पर्धेची रंगत
“न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” या स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी बक्षिसे देण्यात आली.
प्रथम क्रमांक: प्रणाली पिंपळकर – ₹१५,००० ची पैठणी
द्वितीय क्रमांक: किरण धनराज हंसकर – ₹१०,००० ची पैठणी
तृतीय क्रमांक: प्रिया पंदिलवार – ₹५,००० ची पैठणी
लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे
कार्यक्रमात आयोजित लकी ड्रॉमधून महिलांना टीव्हीएस जुपिटर स्कूटर, डबल डोअर फ्रिज, एलईडी टीव्ही, जूसर मिक्सर ग्राइंडर, सिलाई मशीन, कूलर आदी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुलता बावणे यांनी केले, तर विशाखा गिरसावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रियंका खनके, विद्या खाडे, प्रिया बावणे, गुजाताई डोंगे, सोनाली दुरुवटकर यांच्यासह अनेक महिलांनी मोलाचे सहकार्य केले.
या प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे, संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्ष नंदाताई बावणे, तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती शाम रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक बावणे, युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नितीन बावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या सन्मानाबरोबरच समाजातील एकता आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा हा समारोह कोरपना परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.





