लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा (दिनांक 12मार्च .) : केंद्र व राज्य शासनाच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ आज राजुरा येथे काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन व निषेध रॅली काढण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शेतकरी व कामगार वर्गाचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेसमोर जगण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर व राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी शासनाने तात्काळ गॅस व इंधन दरवाढ मागे घ्यावी, कृत्रिम तुटवडा थांबवावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा काँग्रेसच्या वतीने जनतेच्या न्याय हक्कांसाठी व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात नगराध्यक्ष अरुण धोटे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अॅड. अरुण धोटे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, उपाध्यक्ष धनराज चिंचोलकर, न. प. सभापती अनंता ताजने, सभापती पूनम गिरसावडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक संध्या चांदेकर, जिल्हा महासचिव तथा नगरसेवक एजाज अहमद, संतोष इंदूरवार, अभिजीत धोटे, पंढरी चन्ने, इंदुबाई निकोडे, निता बानकर, वज्रमाला बतकमवार, गोलू ठाकरे, ज्योतीताई शेंडे, सुमित्राबाई कुचनकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, छोटूलाल सोमलकर, शैलेश लोखंडे, प्रणय लांडे, कवडू सातपुते, देवानंद चुनारकर, सर्वानंद वाघमारे, भाष्कर वाटेकर, अशोक राव, सय्यद साबिर, संघपाल देठे, आकाश मावलीकर, निरंजन मंडल, चेतन जयपूर, निखील बजाईत, कुणाल माकोडे यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी, कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





