लोकदर्शन गडचांदूर👉मोहन भारती
गडचांदूर येथील ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शाळेच्या आवारात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात तंबाखू, बीडी, सिगारेट व दारू या घातक व्यसनांविरोधात जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष जगदीश ठावरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास अवघडे साहेब आणि प्राचार्या निर्मला ठावरी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यसनाधीनतेमुळे कुटुंब उध्वस्त कसे होतात हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी नाट्याद्वारे समाजात जनजागृती घडवून आणली. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्या निर्मला ठावरी यांनी केले. शाळा पालक सभेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी पालक सभा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्तिक चावके, आर्यन मायकलवार, तौकीर शेख, आयुष रागीट, आरोही गणवीर, ओंकार मुंडे, श्लोक बावणे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
उत्कृष्ट स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली इंदोरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रियांका भंडारवार यांनी केले. हेमलता येरणे, गजानन राम, पिंकू ताई धुळे, रसिका तोडे, अनुपमा पांडे, उषा बावणे, मुस्कान शेख, नाजुका वैद्य यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.