लोकदर्शन 👉 मोहन भारती
बाखर्डी : महात्मा गांधी आयु विज्ञान संस्था सेवाग्राम, जय किसान आदर्श गणेश मंडळ लखमापूर आणि विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लखमापूर येथे मोफत रोग निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या औचित्याने पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील 668 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच 19 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
यावेळी सेवाग्राम येथील चिकित्सा अधीक्षक डॉ. गिरीश देव यांनी आरोग्यविषयक तपासण्या, प्राथमिक उपचार, रेटीना, मोतीबिंदू, काचबिंदू व इतर डोळ्यांच्या समस्यांवर उपाय व काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले, आरोग्य सेविका रेणुका गावडे, आरोग्य सहाय्यक नरेंद्र बदकी, आरोग्य सेवक एस.एम. झाडे, देवराव मडावी, पी.एस. पवार शेळकी, एस.एफ.डब्ल्यू. जगताप, आशाताई पोयाम आदी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्यन टोंगे, अनिकेत उलमाले, अमित आवारी, आकाश भोजेकर, आदित्य आवारी, पंकज पोतराजे, किरण चटप, सचिन भोजेकर, आशिष कौरासे, वैभव भोयर, आर्यन काळे, सौरभ जुनघरे, निशांत बोधे, वैभव उरकुंडे, सचिन आवारी, अमर उलमाले, पवन बोबडे, आदित्य जुनघरे आदींनी परिश्रम घेतले