लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
गडचांदूर (लोकदर्शन प्रतिनिधी – शिवाजी सेलोकर):
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे शांतता समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) जाधव साहेब, जिवतीचे तहसीलदार मॅडम, कोरपना येथील नायब तहसीलदार सौ. वासेकर, गडचांदूर नगरपरिषद मुख्याधिकारी चव्हाण साहेब, जिवती नगरपरिषद मुख्याधिकारी धुमाळ साहेब, तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कदम साहेब उपस्थित होते. याशिवाय जिवती, कोरपना, पाटण टेकमांडवा येथील पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बैठकीत उपस्थितांनी आपापल्या समस्या व सूचना मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी संयमपूर्वक त्या ऐकून घेतल्या व समस्यांचे योग्य निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व नागरिकांनी सण आनंदात, ऐक्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले.