लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना (ता.प्र) : कोरपना तालुक्यातील नांदा येथे नुकतीच काँग्रेसची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत संघटन अधिक बळकट करण्याबरोबरच परिसरातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली. आगामी काळात जनसामान्यांच्या हितासाठी संघर्ष करून काँग्रेसचा झेंडा आणखी उंचावण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सेवा सहकारी संस्थेचे संचालक भाऊराव चव्हाण, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सुरेश राऊत, महादेव गिरडकर, मनोहर काटे, नथ्थु तलांडे, सुरेश धोटे, मनीष लोढे, शेषराव निवळकर, हारून सिद्धिकी, शिवाजी सातपुते, नंदू भोयर, वसंता निसटते, अविनाश काटे, राजू काळे, मनीष राऊत, हेमत भोयर, मारोती गुडे, मनोज हस्तक यांसारखे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.