लोकदर्शन 👉राहुल खरात
व्यक्तीची मेहनत, चिकाटी, जिद्द आणि इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर त्याला यश नक्कीच मिळते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. सिद्धार्थ कुलकर्णी. शालेय जीवनापासून केवळ अभ्यासापुरतं न थांबता खेळ, वाचन, लिखाण, वकृत्व आणि सामाजिक बांधीलकी यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातही त्यांनी प्राविण्य मिळवत अनेक उपक्रमांमध्ये पारितोषिके मिळवली.
त्यांच्या या बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत “देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” या संघटनेचे संस्थापक व मुख्य समन्वयक श्री. गजानन जोशी यांनी त्यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजकारणाच्या क्षेत्रात त्यांची नवी वाटचाल अधिक यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
श्री. सिद्धार्थ कुलकर्णी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
✍️ वार्ताहर : राहुल खरात