लोकदर्शन पिंपरी चिंचवड👉 राहुल खरात
एएसएम (सीएसआयटी) कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुर्णानगर यांच्या वतीने अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित Induction Program नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया, तर उपाध्यक्ष म्हणून ज्युपिटर हॉस्पिटलचे मेंदू विकास तज्ञ डॉ. नरेंद्र मोटारवार उपस्थित होते. तसेच एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. व्ही. पी. पवार, कार्यकारी संचालक डॉ. डी. डी. बाळसराफ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
✨ प्रेरणादायी मार्गदर्शन
डॉ. रिता शेटीया यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की –
ध्येय ठरवा, जिद्दीने मेहनत करा आणि यशस्वी व्हा.
अडथळा कुणीही नसतो, स्वतःला थांबवणारे आपणच असतो.
रोज व्यायाम, प्राणायाम, योग आणि एखादा छंद जोपासा, यामुळे ऊर्जा आणि सकारात्मकता टिकते.
शिक्षण घेत असताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शासनाच्या आणि इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या.
त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी व्हिडीओच्या माध्यमातूनही संवाद साधला.
🎯 इतर मान्यवरांचे विचार
डॉ. नरेंद्र मोटारवार – “तुमच्या भविष्यात काय करायचे आहे, हे ठरवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.”
डॉ. व्ही. पी. पवार – “आजची पिढी मोबाईलच्या अधीन झाली आहे. पालक व शिक्षकांनी प्रयत्न करून त्यांचा कल अभ्यासाकडे वळवावा.”
डॉ. डी. डी. बाळसराफ – “चांग