उरण महाविद्यालयाची दुहेरी कामगिरी – मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार यश ♦️मुक अभिनयात प्रथम, लोकनृत्यात उत्तेजनार्थ पारितोषिक

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. १२ (विठ्ठल ममताबादे) –
मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या सांस्कृतिक युवामहोत्सवात कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने दैदिप्यमान कामगिरी करत मुक अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर भारतीय लोकनृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून उरणचे नाव उंचावले.

हा युवा महोत्सव कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय व उरण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेत एकूण २७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तुषार गावरे, आकाश कांबळे, तसेच थिएटरसाठी ख्यातनाम लेखक निखील पालांडे आणि गौरव रेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

युवा महोत्सवाच्या यशामागे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, ज्येष्ठ प्राध्यापक व माजी प्राचार्य प्रा. किशोर शामा यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक समितीचे प्रा. रियाज पठाण, प्रा. हन्नत शेख, प्रा. डॉ. आनंद गायकवाड, डॉ. अनुपमा कांबळे, प्रा. डॉ. मारोती लोणे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर कार्यालयीन अधीक्षक तानाजी घ्यार यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोंकण ज्ञानपीठ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here