शेतकरी मागतो एक, शासन देते तीन !!

By : Shankar Tadas
चंद्रपूर / कोरपना :
शासकीय कामात कधी काय चमत्कार घडेल सांगता येत नाही. ही यंत्रणाच इतकी गुंतागुंतीची आहे, की सामान्य मेंदूच्या आवाक्यात कधीच येत नाही. आता हेच पहा. एका शेतकऱ्याने आपल्याला ट्रॅक्टर मिळावा म्हणून शासनाकडे मागील तीन वर्षा पासून अर्ज करणे सुरू केले. परंतु यश काही येत नव्हते. निवडीच्या ‘लॉटरी’ पद्धतीमध्ये त्यांचा नंबर काही लागेना. अखेर स्वतःच त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून जवळजवळ आशा सोडलीच म्हणा. परंतु साल 2025 मध्ये त्यांचे नशीब असे काही फळफले की एकाच वेळी तीन ट्रॅक्टरची लॉटरी त्यांना लागली…!! आता लॉटरी म्हटलं की शंका घेण्याचे कारण नाही. असते एकेकाचे नशीब. त्यातही एकाच नावाने दोन ट्रॅक्टर!! हा चमत्कार घडण्यासाठी त्या शेतकऱ्यांने कोणत्या ‘देवा’ला नवस केला होता, याची चौकशी इतर शेतकरी मात्र करू लागले आहे.
राज्य कृषी यंत्रीकरण योजने अंतर्गत विविध औजारासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून सदर औजाराचे कोटेशन, टेस्टिंग रिपोर्ट, आधार कार्ड, व नमुना 8/अ mahadbt पोर्टल वर 7 दिवसाच्या आत अपलोड करावे, अशी सूचना शासनाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here