By : Shankar Tadas
कोरपना :
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत ३ ऑगस्ट रोजी “पाणंद,शिवरस्ते मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड” हा विषय घेऊन विशेष कार्यक्रम नारंडा येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह , तहसीलदार पल्लवी आखरे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गतया कोरपना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावा-गावांमध्ये अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. तसेच अतिक्रमण असलेले पांदण रस्ता त्यांच्यावरील अतिक्रमणे ओळखून अतिक्रमणमुक्तीची कारवाई करण्यात आली.
झाडांची देखभाल व संरक्षणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला.
लागवडीनंतर झाडांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास व पर्यावरण संवर्धन एकत्र साधले गेले.
तसेच गावातील मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार योजनेचा मंजूरी आदेश आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.