लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण, दि. ३१ (प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे):
उलवे येथील जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था तर्फे उरण तालुक्यातील मोरा परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जे. एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल, मोरा येथील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन, पट्टी आदी शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात जाणीव संस्था अध्यक्ष सुनील ठाकूर, पदाधिकारी दिनेश पाटील (बंधू), किरण मढवी, तसेच वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाजेकर, अनिश पाटील, भानुदास वास्कर, चिंतामण पाटील, अंजू पाटील, रवींद्र भोईर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद तारेकर आणि रोहिणी तारेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी प्रास्ताविकात शाळेच्या भौतिक सुविधांविषयी माहिती दिली आणि अशा सामाजिक उपक्रमांच्या गरजेसंदर्भात मनोगत व्यक्त केले. तर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी जाणीव संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरित केले.
संस्थेचे पदाधिकारी दिनेश पाटील यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आपण जन्मत: गरीब असलो तरी शिक्षणाच्या बळावर मोठं होऊ शकतो आणि समाजात आपलं नाव कमावू शकतो – हीच खरी श्रीमंती आहे,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर (वनवासी कल्याण आश्रम, उरण) यांनीही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास माध्यमिक शाळेचे चेअरमन पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी, शिक्षक सुगिंद्र म्हात्रे, अनिल पाटील, मनोज म्हात्रे, स्वप्निल नागमोती, रोहिणी घरत, सुनीता पाटील, राणी कदम, सुप्रिया मुंबईकर, सत्यवान मर्चंडे, रुपाली चौधरी, कोल्हे मॅडम, तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका रोहिणी घरत यांनी केले. सजावटीसाठी घनश्याम म्हात्रे, दिनेश पाटील आणि ममता गवस यांचे मोलाचे योगदान लाभले.