लोकदर्शन👉मोहन भारती
गोंडपिपरी (30 जुलै):
तालुक्यात राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत असून, पोंभुर्णा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात भारतीय जनता पक्षात मोठा पक्षप्रवेश झाला. आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे आजी-माजी सरपंच आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपात सामील झाले.
पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये पानोरा गावचे विद्यमान सरपंच जनार्दन ढुमणे, चेकपारगावच्या सरपंच मनिषा निखाडे, माजी सरपंच बंडू गिरसावळे, तसेच लाठी गावातील देवराव मरसकोल्हे, पारडीचे सुरेश मडावी, संतोष पचारे, संदीप पचारे, सरांडी येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वारलू मेश्राम, रमेश जगताप, संजय घोडाम, भिवसेन कोटनाके, आनंदराव कोटनाके, लक्ष्मण चिंचोलकर आणि विजय भोयर यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले, “गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला आता अधिक गती मिळेल. सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत असून, त्यांच्या सहकार्यातून भाजप अधिक बळकट होईल आणि जनता-हिताचे निर्णय घेणे सुलभ होईल.”
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, भाजप महिला मोर्चाच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, तसेच अर्चना भोंगळे, विजय शेरकुरवार, राकेश पुन, महामंत्री कोमल फरकाडे, भावनाथ सोमलकर, अरूणा जांभुळकर, शारदा गरपल्लीवार, सुरेखा श्रीकोंडावार, शिथिल लोणारे, वैभव बोनगिरवार, मनोज वनकर व तेजस्विता भगत यांची उपस्थिती होती.