लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर, 14 जुलै
युवा उद्योजक व समाजसेवक सतीशभाऊ बेतावार यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे भव्य नागरी सत्कार सोहळा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आ. *मा. देवरावदादा भोँगळे*यांचा नागरी सत्कार आणि त्यांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश.
ही संधी साधून, गडचांदूर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, अनेक नामवंत डॉक्टरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमूर्ती म्हणून आ. मा. देवरावदादा भोँगळे, आमदार, राजूरा विधानसभा क्षेत्र हे लाभले आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सतीशभाऊ बेतावार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे:
📅 दिनांक: १६ जुलै २०२५ (बुधवार)
🕓 वेळ: संध्या. ४:०० वाजता
स्थळ: लक्ष्मी टॉकीज (हॉल), आंबेडकरी बाजार, गडचांदूर
स्नेहभोजन: कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी
आरोग्य शिबिर हे सकाळी ११:०० ते संध्या. ५:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
हा उपक्रम सतीशभाऊ बेतावार मित्र परिवार, गडचांदूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला असून, स्थानिक पातळीवर सामाजिक सलोखा, आरोग्यप्रेम आणि जनतेशी असलेली बांधिलकी याचे उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.
✍️ – मोहन भारती
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर