गडचांदूर ÷मोहन भारती
“गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञान सेवा आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुचे देणगी.” या पवित्र विचारांना अनुसरून गडचांदूर येथील श्री साईराम उत्सव समिती, श्री दत्त मंदिर मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे, या वर्षी या उत्सवाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा
श्री साईराम मंदिर व श्री दत्त मंदिर येथे गुरुंच्या अभिषेकाने व नित्य नियमाने पूजा-अर्चनेने उत्सवाची सुरुवात झाली. सायंकाळी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर श्री साई मंदिर येथून भव्य साईची पालखी, रोषणाई, ढोल-ताशे यांच्या गजरात सायंकाळी ६ वाजता श्री दुर्गा माता मंदिरापर्यंत नेण्यात आली. पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाप्रसाद वितरण
सायंकाळी ८.३० वाजता श्री दत्त मंदिर येथे महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आयोजन समिती
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साईराम उत्सव समिती, श्री दत्त मंदिर मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. शरद जोगी, सागर ठाकुरवार, महादेव एकरे, विनोद तराडे, गणेश सातपाडे, निखिल ठेंगणे, आशुतोष नागोसे, सचिन भोयर, ण्णांना पाचभाई, गणेश चापले, शंकर शीरसागर, प्रशांत पात्रे, आशिष शेरकी, पिंपळकर, रुपेश चूदरी, रोहित शिंगाडे, रोहन काकडे, महादेव हेपट, सुनील झाडे, मनोज भोजेकर, धनंजय, संदीप शेरकी, सतीश उपलेचीवार, रामसेवक मोरे, विठ्ठल डाखरे, आशिष शेरकी, अनिल ठाणेकर, विकी घोरे, दीपक वर्भे, शिरीष बोंगावार, प्रतीक सदनपवार, निलेश ताजने, संतोष बुटले, धवल घोरे, गणेश मोहूले, अतुल तोडसे व सर्व श्री गुरु पौर्णिमा साई उत्सव समिती दत्त मंदिर मंडळ आयोजक उपस्थित होते.
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उत्सवाला गडचांदूर व परिसरातील भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वांनी भक्तिभावाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
– लोक दर्शन न्यूज पोर्टल, गडचांदूर