लोकदर्शन न्यूज पोर्टल👉मोहन भारती
🗓️ दिनांक: २ जुलै २०२५
✍️ प्रतिनिधी – गडचांदूर
गडचांदूर – “१२वी नंतर काय?” या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दिनांक २ जुलै २०२५ रोजी जीवन कौशल्य व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि कॅलिबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते. तर मार्गदर्शनासाठी हेमांगी विश्वास, अंकिता कुचनकर, पौर्णिमा बारापात्रे आणि प्रणय येरोजवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसूटकर, कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सोनाली वाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आशिष देरकर यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, व्यावसायिक अभ्यासक्रम व करिअर संधी यांविषयी सखोल माहिती देण्यात आली. अल्ट्राटेक कंपनीच्या CSR उपक्रमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोलाचा ठरावा, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.