लोकदर्शन👉विशेष प्रतिनिधी
स्थान: जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर
🗓️ दिनांक: 12 फेब्रुवारी 2025
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.
आरोपी अधिकारी –
दिग्विजय आबासाहेब जाधव (वय २९), पद – सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (म.रा.वि.वि.कं.), शाखा कार्यालय जेऊर.
मूळ राहणी – गोविंद बापू नगर, जेऊर.
प्रकरणाचे स्वरूप:
तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतीसाठी वीज जोडणी व पोल उभारणीच्या कामासाठी सहायक अभियंता जाधव यांनी 60,000/- रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर तपासाची दिशा निश्चित करत दि. 12/02/2025 रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदारकडे 10,000/- रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तत्काळ कारवाईत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली असून, त्याचा मोबाईल जप्त करून तपासासाठी ठेवण्यात आला आहे.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईस सहकार्य करणारे अधिकारी व कर्मचारी –
सापळा अधिकारी: श्री. उमाकांत महाडिक, तत्कालीन पोलीस निरीक्षक
तपास अधिकारी: श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, ACB सोलापूर
मार्गदर्शन: श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ACB पुणे परिक्षेत्र
पर्यवेक्षण: डॉ. शितल जानवे / खराडे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे परिक्षेत्र
पथक सदस्य: पोह. शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामिराव जाधव व चालक राहुल गायकवाड (ACB सोलापूर)
📢 सार्वजनिक आवाहन:
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती तुमच्याकडून शासकीय कामाकरिता लाच मागत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधा:
📞 टोल फ्री: 1064
📧 ईमेल: dyspacbsolapur@mahapolice.gov.in / dyspacbsolapur@gmail.com
📱 मोबाईल: 9823225465
☎️ कार्यालय: 0217-2312668
🛑 भ्रष्टाचाराविरुद्ध लढा – प्रत्येक नागरिकाची जबाबदारी!
✍️ लोकदर्शन न्यूज पोर्टल